केंद्र:पीव्हीसी आधार कार्ड, नक्की काय…
आधार कार्डचा वापर बहुसंख्य कामासाठी असल्यामुळे काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं.ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. आधार कार्डचा वापरच मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ते देखील खराब होतं.पण आता ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ‘आधार पीव्हीसी कार्ड’ असं या नव्या स्वरूपाचं नाव आहे. त्यामुळे आता आधार कार्डवरील माहिती पीव्हीसी म्हणजेच polyvinyl chloride कार्डवर प्रिंट करून मिळणार आहे.जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात मिळतं, तसंच आधार कार्डही मिळणार आहे,
आधार पीव्हीसी कार्डाविषयी माहिती देताना UIDAI नं म्हटलंय की, “या कार्डाची प्रिटिंग क्वालिटी चांगली असते आणि ते अधिक काळ टिकतं. शिवाय पावसामुळेही ते खराब होत नाही. यावर क्यूआर कोड असल्यामुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशनही होऊ शकणार आहे.”
तुम्हाला uidai.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोदणी करून ‘आधार पीव्हीसी कार्ड’ घरपोच मिळू शकते. त्याची फी ५० रुपये आहे.