पुण्यात मान्सून दाखल हलक्या पावसाने सुरुवात
आज (दि. 24 ) काही वेळापूर्वी पुण्यात हलका पाऊस सुरू झाला आहे.हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून सक्रीय झाला आहे. विदर्भात मान्सून दाखल झाला असून मुंबई अन् पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे.
पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.8 च्या सुमारास काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय.कात्रज, कोंढवा, धायरी फाटा, वारजे, शिवणे, हिंगणे, सिंहगड रोड, नांदेड सिटी पाऊस पडला. हवामान खात्याने पुण्यात शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता.
या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी सर्व ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.