हेवन जिमनॅस्टिक अकादमीमध्ये आंतररष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस व आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.
दि. २२ जुन रोजी हेवन जिमनॅस्टिक अकादमी, रहाटणी येथे आंतररष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस व आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विजयकुमार पाटील तर कार्यक्रम अध्यक्ष म्हणुन श्री. प्रमोद निफाडकर यांनी भूषवले.कार्यक्रमात मुलांनी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
खेळ हा आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे, व तो तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे सक्षमतेने बघण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती,अध्यक्ष, श्री.विजयकुमार पाटील यांनी मांडले.योग अभ्यास,ओमकार ध्यान बद्दल माहिती देत,आजच्या बदलत्या जिवनसरणीवर पालकांनी मुलांच्या गुणांना वाव देणे गरजेचे आहे हे आपल्या मनोगतात योग विद्याधाम,पिंपरी चिंचवड केंद्रप्रमुख श्री.प्रमोद निफाडकर यांनी मांडले.
प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी यांनी उपस्थितांनकडून योग अभ्यास करून घेतला, तर हेवन जिमनॅस्टिक अकादमीच्या खेळाडूंनी योग व एरोबिक जिमनॅस्टिक खेळाचे सादरीकरण केले.आंतरराष्ट्रीय आँलंपिक दिनाची माहिती व त्याची वैशिष्ट्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी सांगितले.अकादमीच्या प्रशिक्षिका सौ.अलका तापकीर,प्रणित आढाव यांनी पूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांभाळले.कार्यक्रमात योगासने सिद्दी मारे,इष्टी भटनागर,गितीका चौधरी,सिया भावसार,राही पुनतांबेकर यांनी सादर केले.ईश्वरी कंठाळे,अनुष्का किंगे,धानी पटेल,सानवी पाटील, अनवी पाटील, परीजा क्षीरसागर, वृंदा सुतार यांनी ऐरोबिक जिम्नास्टीक चे प्रात्यक्षिक सादर केले.कार्यक्रम पालकांनच्या उत्साही उपस्थिती ने कार्यक्रमाची शोभा वाढली.