September 23, 2023
PC News24
अपघात

जुन्या मुंबई – पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात, एक ठार दोन जखमी

जुन्या मुंबई – पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात, एक ठार दोन जखमी

जुन्या मुंबई – पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ झालेल्या पिकअप आणि कंटेनर अपघातात पिकअप चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून, या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात आज पहाटे सात ते साडेसातच्या दरम्यान झाला आहे.

लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगात जात होता. अंडा पॉईंट येथील उतार अन् वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने दोन पिकअप टेम्पो गाड्यांना जोरदार धडक दिली आणि कंटेनर पलटी झाला. यावेळी एक पिकअप गाडी कंटेनरच्या खाली गेली. यामध्ये पिकअप चालकाचा गाडीमध्ये अडकल्याने मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत.

जखमीं दोघांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची देवदूत यंत्रणा आणि खोपोली येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू करत बाहेर काढत उपचारासाठी दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस, आय आर बी, यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पिकप गाडी आणि आतमध्ये अडकलेला चालक यांना काढण्याचे कार्य सुरू आहे.

Related posts

बेपत्ता असणाऱ्यांना मृत घोषित करणार!!

pcnews24

दिघी:सोसायटी पार्किंग मधील वाहनांना मोठी आग-दिघी येथील घटना.

pcnews24

चाकण : नाशिक पुणे महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीने गमावला जीव

pcnews24

अमरावती : चार्जिंगला लावलेला मोबाईल काढताना हाय व्होल्टेज विद्युत प्रवाहाने तरुणाचा मृत्यू

pcnews24

रायगड जिल्ह्यात भूस्खलनाने दरड कोसळल्याची घटना, मुख्यमंत्री घटना स्थळी दाखल.

pcnews24

भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत

pcnews24

Leave a Comment