March 1, 2024
PC News24
सामाजिक

सोसायटीधारकांचे प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’ नक्की काय विषय…

सोसायटीधारकांचे प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’ नक्की काय विषय…

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘मास्टर प्लॅन’ तयार करणार आहे. त्यासाठी सोसायटीधारक, बांधकाम व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी अशी संयुक्त बैठक घेवून आराखडा तयार करण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बैठक झाली. भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारक आणि समाविष्ट गावांतील पाणी समस्यांबाबत सोसायटीधारकांच्या विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे आणि पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार लांडगे यांनी सोसायटीधारकांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सादर केली होती. सदनिका हस्तांतरण, सोसायटी हस्तांतरण आणि बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य सोसायटी धारकांना सहन करावा लागणारा नाहक त्रास याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यापार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवडमधील सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक आराखड्याची तयारी केली आहे.त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. त्याद्वारे सोसायटी धारक प्रतिनिधी, फेडरेशनचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधी यांची समिती गठीत करुन प्रकल्प किंवा सोसायटी हस्तांतरण करताना घ्यावयाची काळजी आणि नियम व अटी-शर्ती तयार करण्यात येतील. ज्यामुळे भविष्यात सोसायटीधारक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये वादाचा प्रसंग उद्भवणार नाही.

पाणी पुरवठ्याबाबत ठेकेदार नियुक्ती केली जाते. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक यांचे लागेबांधे असल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते. यात महापालिका अधिकारीही सामील आहेत, अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याबाबत नियोजनात होणारी ठेकेदारी बंद करावी. प्रशासकीय पातळीवर समान पाणीपुरवठा धोरण अवलंबावे. ज्यामुळे विशिष्ट भागातील नागरिकांना पाणी समस्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

Related posts

पिंपरी-चिंचवडची ‘नॉलेज सिटी’ म्हणून ओळख करण्याचा संकल्प – आमदार महेश लांडगे.वाचनासाठी ग्रंथ उपलब्धतेवर भर

pcnews24

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर

pcnews24

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

कोकण:’ब्लॅक पँथर’चे सिंधुदुर्ग येथील आंबोलीच्या जंगलात दर्शन.

pcnews24

इंडियन स्वच्छता लीग 2.0 का क्षेत्रीय आरोग्य विभाग.

pcnews24

चाकरमान्यांच्या सोयीची सिंहगड एक्सप्रेस वादामुळे चर्चेत.. एक्सप्रेसच्या पाच बोगी ही केल्या कमी.

pcnews24

Leave a Comment