September 26, 2023
PC News24
राजकारण

महाराष्ट्र:आम्ही एक वर्षापूर्वी जो निर्णय घेतला, तो योग्यच होता…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा घणाघाती आरोप.

महाराष्ट्र:आम्ही एक वर्षापूर्वी जो निर्णय घेतला, तो योग्यच होता…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा घणाघाती आरोप.

श्रीराम मंदिराला ज्यांनी विरोध केला, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ज्यांनी विरोध केला, काल त्यांच्याबरोबर तुम्ही उद्धव ठाकरे जाऊन बसलात?आणि दिलों का गठबंधन केलं.?म्हणूनच एका वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला, तो कसा योग्य होता? याची खात्री या पटण्याच्या बैठकीनंतर झाली आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पटणा येथील बैठकीनंतर दिलों का गठबंधन अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. त्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, राज्यातील अनेक घडामोडी बाबत भूमिका स्पष्ट केली.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धवजी सतत भाजपावर आरोप करायचे. मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन केलं असं म्हणायचे. मग काल तुम्ही काय केलं? तुम्ही मुफ्तींबरोबर बसलात, गप्पा मारल्या. काल तुम्ही चारा घोटाळ्यातले आरोपी लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर बसलात.

आता मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात हे लोक आंदोलन करणार आहेत. पण तुम्ही हे आंदोलन कुठल्या तोंडाने करणार आहात.? या भ्रष्टाचाऱ्यांबरोबर तुमचं साटंलोटं पाहायला मिळाले असल्याच सांगात उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात हे 15 पक्ष एकत्र आले. परंतु, या सर्वांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर नैराश्य स्पष्ट दिसत होतं. परंतु, मोदींविरोधात या लोकानी एकत्र येणं हा मोदीजींचा विजय आहे. अशा किती आघाड्या केल्या आणि किती विरोधक एकत्र आले. आरोप केले तरी जनतेनं यांच्यातल्या एकालाही 40 पेक्षा जास्त खासदार दिले नाहीत. विरोधी पक्षनेता बनवण्याइतके खासदारही यांच्याकडे नाहीत. अशा शब्दात विरोधी पक्षावर त्यांनी खरमरीत टीका केली.

Related posts

पुढील 15 दिवसांत ‘हे ‘ सरकार कोसळणार,संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ ….

pcnews24

ब्रेकिंग न्यूज:राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटात ?

pcnews24

लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार ?

pcnews24

आंबेडकरांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

pcnews24

‘रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य’ : एच.डी.देवेगौडा.

pcnews24

दादांच्या विरोधात भूमिका घेणार नाही;सुप्रिया सुळे

pcnews24

Leave a Comment