पाकमधून घुसखोरी करणारे ड्रोन भारताने पाडले,काय प्रकार घडला ?
पाकिस्तानमधून भारताच्या हद्दीत ड्रोन पाठवून ड्रग्ज तस्करीचे अनेकदा प्रकार घडले आहेत. त्या- त्या वेळी भारतीय सुरक्षा दलाने हे प्रकार हाणून पाडले आहेत. आजही याच प्रकारे पंजाबमधील तरनतारनरमध्ये ड्रग्ज तस्करी करणारे ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करत पाडले. त्याला लटकवण्यात असलेल्या बॅगमधून जवानांनी 2.6 किलो हेरॉईन जप्त केले असून एका संशयिताला ताब्यात घेतले. जवान या प्रकरणी चौकशी करत आहेत.