शाळेतल्या गुरुजींचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल,पालकांचा संताप
शाळेतल्या विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते पण शिक्षक पदाचा अवमान करणारी घटना बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली आहे.
शाळेत शिक्षक चक्क दारू पिऊन झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील तरडोली मधील भोईटे वस्ती येथील शाळेत ही घटना घडली आहे. गावातील नागरिकांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. पालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत भरत चव्हाण हे शिक्षक आहेत त्यांच्या कडून हे गैरवर्तन घडले आहे
चव्हाण यांनी याआधी देखील मद्यपान करुन शाळेत येण्याचा प्रताप केला आहे. ग्रामस्थांनी आणि पालकांनी त्यांना गेल्यावर्षी सुधारण्याची संधी दिली मात्र या शिक्षकाने त्याच्यावर लक्ष न देता तर्र होउन शाळेत येणे चालूच ठेवले.
शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेले होते असे या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे, भरपूर दारू प्यायल्याने ते शुद्धीत देखील नव्हते. यावेळी नागरिकांनी काही प्रश्न विचारल्यानंतर शिक्षकाला नीट बोलता देखील येत नव्हते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. शिक्षणासाठी शाळेत घालतात. . पण
पालक आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत शिक्षकाचे असे वर्तन पाहून पालक संतापले आहेत. या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.