September 23, 2023
PC News24
गुन्हा

मोटार सायकल चोरणारी दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात.१५ मोटारसायकली जप्त

मोटार सायकल चोरणारी दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात.१५ मोटारसायकली जप्त

आज गोंदिया येथील तिरोडा मध्ये पोलिसांनी मोटार सायकल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून १५ वाहनें जप्त केली आहे.

तिरोडा शहर व परिसरात मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण मागील काही दिवसात खूप वाढले होते. या अनुसंगाने तिरोडा पोलीस रात्रभर गस्त घालत होते. दि. २४ च्या पहाटे गस्त घालत असताना पोलिसांना एक १६-१७ वर्षाचा मुलगा मोटार सायकल ढकलत नेत असल्याचा दिसला. त्याला हटकून चौकशी केली. त्याचे कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले व अजून एक साथीदार बाहेरगावी गेला असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी दरम्यान आज १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या व अजून सहा मोटार सायकलींची माहिती मिळाली असून त्या उद्यापर्यंत मिळविण्यात येतील. तिरोडा पोलिसांनी विधी संघर्ष बालकांवर भा.दं.वि. ३७९,३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात झाली. पोलीस निरीक्षक देविदास कठाडे, पोलीस हवालदार नितेश बावणे, ज्ञानोबा श्रीरामे, सूर्यकांत खराबे चेतन शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related posts

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.

pcnews24

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

pcnews24

वारजे येथे रस्त्याच्या कडेला सापडली दोन दिवसांची बेबी गर्ल

pcnews24

अंमली पदार्थ विरोधी पथकाने 31 किलो गांजा पकडला

pcnews24

पिंपरी चिंचवड:संघटित गुन्हेगारी करणाऱ्या करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे.

pcnews24

महाराष्ट्र:समाजकंटकाकडून शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या पिकांचे नुकसान.

pcnews24

Leave a Comment