मणिपूर :महिलांनी अतिरेक्यांना सोडण्यास भाग पाडले.
मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली. माहिती देताना, सुरक्षा दलांनी सांगितले की, महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1500 लोकांच्या जमावाने त्यांना घेरले. तेव्हा त्यांना अतिरेक्यांना सोडण्यास भाग पाडले गेले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे आम्हाला त्याला सोडावे लागले. आम्ही त्यांच्या ताब्यातील शस्त्रसाठा जप्त केला व त्यांना जाऊ दिले, असे ते म्हणाले.