चिंचवड:श्री साईनाथ बालक मंदिरामध्ये पालकांची कार्यशाळा.
श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ बालक मंदिर शाळेत पालकांची कार्यशाळा उत्साहात पार पडली. पालकांनीही मुलांप्रमाणे विविध गोष्टींचा या कार्यशाळेत आनंद घेतला. सुमारे शंभर पालकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर, कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक, प्रज्ञा पाठक, मानसी कुंभार, शितल कुलकर्णी, प्रज्ञा जोशी, योगिता देशपांडे यांनी सहकार्य केले.कार्यशाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले.