महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनांक २५ व २६ जून दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२३ चे आयोजन करण्यात आले असून चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात विविध कार्यक्रम होणार आहेत. –
प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. साडेपाच वाजता करिअर विषयक मार्गदर्शन, सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील लोप पावत असलेली लोक – कला, ग्रामीण शहरी गीते, नाट्यरूपी संस्कृती यांवर माहिती देणारा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सकाळी महापालिकेत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस तर पावणे अकरा वाजता केएसबी चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येणार आहे. त्यानंतर साई उद्यानात शिवकालीन शस्त्रे व दस्तऐवजांचे प्रदर्शन होणार आहे. सायंकाळी पोवाडा आणि लोककलेचा कार्यक्रम होणार आहे