अमेरिका :भारतातून ‘चोरीला गेलेल्या १०० मौल्यवान पुरातन वस्तू …आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोनाल्ड रीगन सेंटरला भेट, नक्की काय संबंध…
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी वॉशिंग्टन डी. सी. मधील रोनाल्ड रीगन सेंटर येथे भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी भारतातून ‘चोरीला गेलेल्या १०० पुरातन वस्तू भारताला परत देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याची माहिती दिली. भारतातून चोरीला गेलेल्या या पुरातन वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकल्या गेल्या होत्या. त्या अमेरिकेमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यावर अमेरिकेने त्या भारत सरकारला परत देण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ३०७ पुरातन वस्तू मध्ये देखील परत केल्या होत्या.तस्करी नेटवर्कद्वारे या अनेक लहान वस्तू चोरीला गेल्या होत्या,त्यांची किंमत सुमारे ४ दशलक्ष डॉलर आहे. गेल्या काही वर्षात केलेल्या अनेक परदेश दौऱ्यां दरम्यान भारतातून चोरीला गेलेल्या पुरातन वस्तूंबाबत मोदी अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांशी बोलले होते. त्यानंतर एकूण २५१ पुरातन वास्तू भारतात परत आणण्यात आल्या, त्यापैकी २३८ पुरातन वस्तू २०१४ पासून करण्यात आल्या आहेत.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांचे अमेरिकेमधील त्यांच्या संबंधित क्षेत्रातील यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताच्या वृद्धीसाठी योगदान देण्यास आमंत्रित केले. भारत- अमेरिका संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
द्विपक्षीय भागीदारीच्या भविष्यातील क्षेत्रांवर तसेच भारतात सध्या होत असलेल्या सखोल परिवर्तनावर आणि विविध क्षेत्रातील प्रगतीवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.