भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला 40 वर्ष पूर्ण
कोणताही क्रिकेटप्रेमी आणि भारतीय आजचा (25 जून) दिवस विसरू शकत नाही. कारण क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकला होता. भारतानं आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1983 रोजी लॉर्ड्समध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाला पराभूत केले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने ही कामगिरी केली होती.