रशियात गृहयुध्दात ब्लादिमिर पुतीन सत्ता गमावण्याची दाट शक्यता, संबंधित घडामोडी
मॉस्को.. युक्रेनशी गेल्या वर्षभरापासून वर्षभरापासून युद्धात गुंतलेल्या रशियात आता अंतर्गत कलह सुरू झाला आहे. गेल्या काही तासांत तेथे अत्यंत वेगाने घडलेल्या घडामोडींमुळे त्या देशाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांना कदाचित सत्ता गमवावी लागू शकते अशी स्थिती असून, संपूर्ण जगाचे रशियाकडे लक्ष लागून राहिले आहे. रशियातील या नव्या नाट्याची सुरुवात करणाऱ्या वॅगनर आर्मीने तर येत्या काही तासांत रशियाला नवीन राष्ट्रपती मिळतील अशी घोषणाच केली आहे. खासगी मिलिटरी कंपनी असलेल्या वॅगनर ग्रुपने रशियाच्या लष्कराच्या विरोधातच बंड पुकारले आहे. तर वॅगनर समूहाच्या खासगी आर्मीने जे सशस्त्र बंड केले आहे तो देशद्रोह असून, ज्यांनी कोणी रशियाच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली आहेत त्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशात मार्शल लॉ लावण्यात आला असून नियम मोडणाऱ्याला ताबडतोब अटकेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वॅगनर आर्मीने एका वाहिनीच्या माध्यमातून संदेश जारी केला आहे. पुतीन यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे व त्याचे मूल्य त्यांना मोजावे लागेल, असा इशारा देतानाच रशियात आता नवे राष्ट्रपती येतील, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. थोडक्यात रशियात आता गृहकलह सुरू झाला आहे.या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दो गन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. एर्दोगन यांनी रशियाला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते आहे.
काही महत्वाच्या घडामोडी
•रशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या कोब्रा नामक आपत्कालीन समितीची घेतली तातडीची बैठक.
•रशियाने सुरू केले दहशतवाद विरोधी अभियान इंटरनेट बंद करणार
•पुतीन यांच्या जिवालाही धोका; सैनिकांनी एकत्र येण्याचे माजी राष्ट्रपती मेदवेदेव यांचे आवाहन
•वॅगनरने रशियाला धोका दिला- पुतीन
•आमचे २५ हजार लढवय्ये मरण्यासाठी तयार. त्यानंतर आणखी २५ हजार जण येतील- वॅगनरच्या प्रमुखाचा दावा