February 26, 2024
PC News24
राजकारण

पिंपरी चिंचवड: नितीन गडकरी यांचा गुरुवारी पिंपरी चिंचवड दौरा

नितीन गडकरी यांचा गुरुवारी पिंपरी चिंचवड दौरा

प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथाच्या प्रकाशनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांचा गुरुवारी ( दि.29 ) पिंपरी चिंचवड शहर दौरा असणार आहे.

पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी लिहिलेल्या व संपादन केलेल्या या ग्रंथामध्ये प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार व सांस्कृतिक कार्याचा वेध घेण्यात आला असून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेले ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय, विधिमंडळातील त्यांची गाजलेली भाषणे, त्यांचे शैक्षणिक कार्य तसेच देशभरातील मान्यवरांचे लेख, मुलाखती व इतिहासात दडलेल्या शेकडो घटना व घडामोडींच्या नोंदी या ग्रंथात मांडण्यात आल्या आहेत.

रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान व अंशुल प्रकाशन यांच्या वतीने आकुर्डी येथील पीसीसीओई कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला अनेक नेत्यांची उपस्थिती आहे अशी माहिती रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास दादा पवार व अंशुल प्रकाशनच्या संचालिका प्रा. तृप्ती जगताप यांनी दिली.
यामध्ये प्रमुख पाहुणे दिग्विजय सिंग, अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद मोरे, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील,प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. गजानन एकबोटे,अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप आणि प्रा. रामकृष्ण मोरे यांचेबरोबर काम केलेले सहकारी, मित्र, स्नेही, सनदी अधिकारी व चाहते इ. मंडळी असतील

Related posts

औरंगजेबाच्या कबरीला भेट देवून प्रकाश आंबेडकरांचे मुस्लिम कार्ड?

pcnews24

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाला नवीन ‘मुख्य प्रवक्ता’.

pcnews24

… म्हणून साजरा होता ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’

pcnews24

लंडन मध्ये राज्याभिषेकावेळी झळकले ‘नॉट माय किंग’ पोस्टर

pcnews24

आज पिंपरी चिंचवड बंद;शहरात पोलिस बंदोबस्त

pcnews24

अजित पवार विरुद्ध संजय राऊत वादामध्ये राऊत यांची माघार

pcnews24

Leave a Comment