आनंदाचा ‘ वर्षाव ‘… संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची जोरदार बॅटिंग
बहुप्रतिक्षित मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मान्सूनचं आगमन राज्यभरात रखडलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला ही दिलासा देणारी घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं २३ जून रोजी केली होती. मात्र, काल सकाळपासून राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली होती. मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या सह विविध जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली होती. मुंबईत आज सकाळ पासूनच पावसाची दमदार बॅटिंग चालू आहे. त्यानंतर हवामान विभागाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे की आज २५ जूनला मान्सून सर्व महाराष्ट्रात व्यापला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुणे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्राला मान्सूनने आज व्यापले आहे. पुणे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आणि घाटमाथ्यावर सकाळपासून संततधार पाऊस पडतो आहे.
Desktop Image:Robyn Hathorn