छत्रपती शिवाजी महाराज यांना छळणाऱ्यांचे कसले कौतुक करता?संभाजीराजे यांचा थेट संतप्त सवाल
औरंगजेबच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे.सध्या सोशल मीडियावर एम आय एम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतील औरंगाजेबच्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या माणसाने त्रास दिला. छत्रपती संभाजीराजे यांची ज्याने हत्या केली. त्याचं कुणी कसं कौतुक करू शकतं?कसं काय कुणी औरंगाजेबचं नाव घेऊ शकतं? असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी केला आहे.
औरंगाजेबच्या कबरीची प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पाहणी केली. तिथे जाऊन त्यांनी माथा टेकला. त्यावरून संभाजीराजे यांनी सल्ला दिलाय की हे दुर्दैवी आहे. हे काही महाराष्ट्राचे संस्कार नाही. तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन अभिवादन केलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले.
भावी मुख्यमंत्री नावाचा बॅनर लावण्यात आला त्यावर संभाजीराजे म्हणाले, मी काही हे पोस्टर लावलेले नाहीत. माझ्या मनात काही नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहणं हे माझं ध्येय आहे. ते मी करतो आहे.