मोहित कंबोजांचे उध्दव ठाकरेंना खुलं चॅलेंज!!
भाजप नेते मोहित कंबोज यांनी उध्दव ठाकरेंना खुलं आव्हान केले आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी, कोविडबद्दल बोलणाऱ्यांचे कुटुंबीय दारू पिऊन कोणती जबाबदारी पार पाडत होते, याचा एक व्हिडिओ मी मागील महिन्यात शेयर केला. असे 110 व्हिडिओ माझ्याकडे आहेत. काहींनी मला रोखले म्हणून मी शांत आहे. उध्दव ठाकरेंनी चॅलेंज स्वीकारले तर उद्या नमुना म्हणून एक व्हिडिओ देईन,” असे 5 पेनड्राईव्हचा फोटो शेयर करत ते म्हणाले.