तडीपार गुंडावर गुन्हा तर तिघांना अटक, पिस्टल व जिवंत काढतुस प्रकरणी रावेत येथे कारवाई
देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काढतूस बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर एका तडीपार गुंडावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी ( दि.24) दुपारी पुनावळे येथील स्मशानभूमी जवळ केली आहे.
किशोर बापू भोसले (वय 31 राहणार पुनवळे), अमित दत्तात्रय पाटोळे (वय 23 राहणार रावेत) अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (राहणार पुनावळे) यांना अटक केली असून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (रा ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलीस नाईक आशिष लक्ष्मण बोडके यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्टल,दोन जिवंत काडतुसे असा अंदाजे 51 हजार रुपयाचा शस्त्र साठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व अमित याच्याकडे दोन जिवंत काडतुसे सापडली हे शस्त्रे अमोल याच्या सांगण्यावरून रविराज याच्याकडून आणली होती.आरोपींवर रावेत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.