चाकण:नाशिक पुणे महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीने गमावला जीव
बसने पाठीमागून दिलेल्या धडकेत 28 वर्षीय दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला आहे.शनिवारी(दि.24) नाशिक पुणे महामार्गावर दुपारी मुटकेवाडी सिग्नलला हा अपघात झाला.याप्रकरणी मुलीचे वडील दत्तात्रय सखाराम थोरात (वय 61 रा. मंचर ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बस वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 28 वर्षाची मुलगी तिच्या मोपेड गाडीवरून चाकण मार्गे मोशीकडे जात असताना मुटकेवाडी सिग्नल येथे थांबली. पांढऱ्या रंगाच्या बसने तिला पाठीमागून जोरात धडक दिली. यावेळी अपघातानंतर तेथे न थांबता बस चालक निघून गेला.मुलगी गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. चाकण पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.