देश :दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी मान्सून, 62 वर्षांनंतर पुन्हा तेच रेकॉर्ड
21 जून 1961 रोजी नैऋत्य मान्सून दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी दाखल झाला होता त्या घटनेची पुनरावृत्ती या वर्षी झाली आहे. दोन्ही शहरांमध्ये आज मुसळधार पाऊस झाला.
मान्सून दिल्लीत साधारणपणे 27 जूनर्पयत दाखल होतो. यावर्षी तो नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. मुंबईत मान्सून 11 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तब्बल दोन आठवडे उशीरा मान्सून मुंबईत दाखल झाला त्याचवेळी राजधानी दिल्लीतही तो दाखल झाल्याने एक दुर्मिळ योगायोग 62 वर्षानंतर पुन्हा घडल्याने नवीन रेकॉर्ड तयार झाले आहे.
आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संथ सुरुवात झालेल्या मान्सूनने आता वेगाने प्रगती केली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगड, ओडिशा, ईशान्य भारत यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. पश्चिमबंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग आणि हरियाणाचा काही भाग आहे.