घोडेगाव: चार नराधमांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार… घोडेगाव,आंबेगाव ता. जि.पुणे येथील घटना
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या घोडेगाव गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणी नेऊन चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण आंबेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी चौघांपैकी एकाला ताब्यात घेतलं आहे. याबाबत घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.,23) रोजी पीडित महिला व तिचा प्रियकर आकाश चंद्रकांत भालेराव हे मोटारसायकल वरून अज्ञात ठिकाणी जात होते. त्याचवेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले. त्यांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून आळीपाळीने
सामुहिकरित्या बलात्कार केला. “याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली. तरीदेखील,महिलेने लगेच घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.
घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सर्व माहिती सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत चौघांविरोधत तक्रार दाखल केली. यातील आकाश चंद्रकांत भालेराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तिघांचा तपास सुरू आहे. सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी दाखल केला आहे.
या घटनेनं आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, घोडेगाव पोलिसांनी गँग रेपचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास पोलिस करत आहे.