पिंपरी चिंचवड:उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
शहरात सातत्याने होणाऱ्या वाढत्या अपघातांना आळा घालता यावा यासाठी पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षकांना मोशीत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मोटार स्कूलची कर्तव्ये व जबाबदाऱ्या मोटार वाहन कायद्या अंतर्गत मोटार प्रशिक्षणासाठी असलेल्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण, वाहतुकीचे नियम,रस्ता सुरक्षा इत्यादी बाबींचे प्रशिक्षण प्रशिक्षकांना देण्यात आले. या कार्यशाळेत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, सहायक मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे, सुशांत पाटील, मंगेश पाचपुते, तेजस्विनी
चोरगे यांनी मार्गदर्शन केले. मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे नानासाहेब शिंदे, अनंत कुंभार यांच्यासह शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आणि प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांनी तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांनी आभार मानले.