September 28, 2023
PC News24
महानगरपालिका

महानगरपालिका : वैद्यकीय विभागात लिपिकाकडून16 लाखांचा अपहार, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई

महानगरपालिका : वैद्यकीय विभागात लिपिकाकडून16 लाखांचा अपहार, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे मानधनाची 16 लाख रुपयांची बीले काढल्याचा धक्कादायक प्रकार नवीन जिजामाता रुग्णालयातील लिपिकाने केला आहे. संबंधित लिपिकाला पालिका सेवेतून निलंबित केले असून विभागीय चौकशी करण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.

महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत नवीन जिजामाता रुग्णालयातील दत्तात्रेय विठ्ठल पारधी असे त्या लिपिकाचे नाव आहे. रुग्णालयात कार्यरत गट ‘अ’ व ‘ड’ वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामकाज, मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मासिक बिल, सार्वजनिक सुट्यांचे बिल अशी जबाबदारी पारधी याच्याकडे होती.त्यांनी सप्टेंबर 2020 ते मार्च 2023 या कालावधीत बोगस बिले काढून 16 लाख रुपयांचा अपहार केला असून तसे त्याने लेखी स्वरूपात मान्य केले आहे.

रुग्णालयाच्या जुलै 2020 च्या मानधन बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर कसून चौकशी केली असता त्यात पारधी यांनी कार्यरत नसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावे मानधनाची बिले काढल्याचे आढळले तसेच मानधनाचे बील तयार करताना अधिकारी, कर्मचारी यांची संख्या देखील जुळत नसल्याचे लक्षात आले आहे.

Related posts

“भारतीय उद्योगांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करणारे आयटीआय ट्रेड ओळखणे” या विषयावर उद्योगनगरीत कार्यशाळेचे आयोजन.

pcnews24

महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाची जबाबदारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे

pcnews24

पिंपरी-चिंचवड शहरात ‘रुफ टॉप हॉटेल’ना मोठी मागणी,पण महानगरपालिकेचे अधिकृत/अनाधिकृत नियम आणि सुरक्षिततेचा मोठा प्रश्न.

pcnews24

महापालिका राबविणार महिलांसाठी ‘ या ‘ योजना..31 ऑगस्टपर्यंत अर्ज मुदत

pcnews24

महत्वाचे!!! आज काही भागात दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद

pcnews24

शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा,देशी विदेशी गावठी दारुसाठी वापर

pcnews24

Leave a Comment