September 28, 2023
PC News24
राजकारण

भाजपला मुळासकट फेकून दिले…कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल

भाजपला मुळासकट फेकून दिले…कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल

कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिले, आता देशासह महाराष्ट्रातून उखडून टाकण्याची आमची जबाबदारी असल्याचा हल्लाबोल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

आज सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून सांगलीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी महानिर्धार मेळावा पार पडला. सत्कार प्रसंगी बोलताना सिद्धरामय्या यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार देखील भ्रष्ट असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील भाजप सरकार नेस्तनाबूत करून उघडून टाकण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.असेही आवाहन केले.सिद्धरामय्या यांनी सांगितले की,मुळासकट भाजपाला फेकून देण्याची गरज असून ती सर्वांची जबाबदारी आहे. कर्नाटकात भाजप कधीही जनतेच्या आशीर्वाद घेऊन निवडून आले नाही. केवळ ऑपरेशन कमळ आणि आमदार खरेदी करून सत्तेवर आले. ऑपरेशन कमळ हे आमदार खरेदी विक्रीचा उद्योग आहे.

कोट्यवधी खोके देऊन आमदार खरेदी करण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार देखील असेच सत्तेत आले आहे. देश किंवा राज्यातील भाजप सरकार असो त्यांचे विकासाचे धोरण नाही. फक्त एक उद्योग आहे तो म्हणजे लाच घेणे, लाच देणे आहे..अशी आगपाखड सिद्धरामय्या यांनी केली.

कोट्यवधी खोके देऊन आमदार खरेदी करण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार देखील असेच सत्तेत आले

Related posts

महाराष्ट्र:बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर, काही मंत्र्याच्या खात्यामध्ये फेरबदल.

pcnews24

अहमदनगर : नाभिक समाजही आता आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात

pcnews24

अजित दादांकडून गिरीश महाजन यांच्या फिटनेसचं कौतुक;साठीच्या पुढे गेले पण….

pcnews24

महाराष्ट्र:काँग्रेस आणि ठाकरे शरद पवारांशिवाय ‘पॉवर’ दाखवणार का?प्लॅन ‘बी’ ठरला?

pcnews24

जितेंद्र आव्हाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

भाग २ चिंचवड विधानसभा मतदारसंघ : आमदार अश्‍विनी जगताप.

pcnews24

Leave a Comment