वाल्हेकरवाडी :छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, दुसऱ्या पत्नीने केला छळ तर पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार
शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या पत्नीने पतीचा छळ केला अशी तक्रार पहिल्या पत्नीने चिंचवड पोलिस स्टेशनला दिली आहे.हा प्रकार जून 2022 ते 25 मे 2023 या कालावधीत चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे घडला आहे.
याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात रविवारी ( दि.25)फिर्याद दिली असून पतीची दुसरी पत्नी तसेच आणखी एक महिला आरोपी व आदित्य राजगुरू सर्व राहणार चिंचवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत पतीचे नाव दयानंद अरुण रावडे (वय 36 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आहे. या तिघांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती दयानंद रावडे यांनी एका महिलेशी दुसरा विवाह करत संसार थाटला. परंतु आरोपींनी पैशाच्या कारणावरून पतीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला असे सांगण्यात येत आहे.