September 23, 2023
PC News24
धर्म

मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित

मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित

संत वाङ्मय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील मोनोग्राफ (लघुप्रबंध/तात्त्विक चरित्र) साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. हे पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत समाविष्ट झाले आहे. अशी पुस्तक-मालिका ही अकादमीतर्फे मूळ लेखन भाषेशिवाय एकूण 20 भाषांमध्ये केली जाते. त्यामुळे हे पुस्तकही 20 भाषेत जाणार आहे !

पुस्तकाच्या लेखिका मनीषा बाठे यांनी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

समर्थ रामदासांचे विचार, जीवनकार्य,संप्रदाय,भारत-भ्रमण, दासबोध आदी ग्रंथनिर्मिती यांचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आल्याने ते महत्त्वाचा दस्तावेज ठरले आहे.साहित्य अकादमीने 2020 मध्ये या विषयाच्या लेखनासाठी मनीषा बाठे यांची निवड केली होती. सदर सैद्धांतिक प्रबंध समीक्षणादी प्रक्रियेनंतर 3 वर्षांनी प्रकाशात येत आहे. याआधी साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत मराठीतील ज्ञानदेव, नामदेव, केशवसुत व दत्तकवी आदींबाबत मोनोग्राफ पूर्वप्रसिद्ध आहेत. आता याच मालिकेत समर्थ रामदासांचे तत्त्वज्ञान प्रथमच प्रकाशित होत आहे. समर्थांचे हे तात्त्विक चरित्र 96 पानी व अंदाजे 29 हजार शब्दांचे आहे.

‘400 वर्षे अस्तित्वात असलेल्या संप्रदायाचा 1852 पासून उपलब्ध असलेला प्रकाशित वाङ्मयीन इतिहास आणि एकूण 400 वर्षांचा संप्रदायाचा मागोवा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. समर्थ रामदासांच्या जीवनकार्यासोबत मध्ययुगीन हस्तलिखित साधनांचा संदर्भ, रामदासांची तपश्चर्या, लेखनारंभ ते अनुयायांचे शिक्षण,संप्रदाय स्थापने मागची पूर्वपीठिका, रामभक्त ते रामोपासक हा प्रवास, पंजाबपर्यंतच्या भारत-भ्रमणाचे पुरावे आदी पुस्तकात देण्यात आले आहेत.

पुस्तकाच्या लेखिका मनीषा बाठे यांनी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ‘रामदासी संप्रदायाच्या ‘रामोपासना, बलोपासना व ज्ञानोपासनेच्या प्रशिक्षणाचे केंद्र असलेल्या मठांचा विस्तार हा महाराष्ट्रासह अकरा राज्यात व्यापला होता.

समर्थांच्या कारकिर्दीतच नव्हे तर नंतरही तीन शतके अव्याहत विस्तारत आहेत. या मठांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप न देता ‘लोकशिक्षणाची’ प्रेरक श्रद्धास्थाने बनवीत, या ‘रामदासी मठरचना’ समर्थांच्या कारकिर्दीतच नव्हे तर नंतरही तीन शतके अव्याहत विस्तारत आहेत.स्थानिक भाषां मधील हस्तलिखित नोंदी पाहिल्या तर या मठांचे कार्य हे ‘आधुनिक वैचारिक चळवळीप्रमाणे’ होते याची साक्ष मिळते’, असे लेखिका मनीषा बाठे यांनी म्हटले आहे.

Related posts

श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांच्याकडून मोफत ‘फराळ सेवा’.

pcnews24

रायगडावर पोलिसांचा लाठीचार्ज

pcnews24

RSS पुण्यातील कार्यक्रमाची शिस्तबद्ध आखणी;मोबाईल नेण्यास देखील बंदी

pcnews24

‘मायलेकाची ‘अशी’ भेट पाहून सर्वांचे मन हेलावून गेले’,सरकारला जेरीस आणणारे जरांगे पाटील यांना आईला पाहताच कंठ दाटून आला..

pcnews24

मनोज जरांगे यांचे उपोषण मागे;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण मागे घेतले.

pcnews24

यंदाची वारी होणार आरोग्य वारी- थं क्रिएटीव्ह’ सामाजिक संस्थेचा पुढाकार

pcnews24

Leave a Comment