September 23, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड:उद्योजक आणि महावितरण अधिका-यांची महत्वपूर्ण बैठक,लघुउद्योग संघटनेने केल्या या मागण्या.

पिंपरी चिंचवड:उद्योजक आणि महावितरण अधिका-यांची महत्वपूर्ण बैठक,लघुउद्योग संघटनेने केल्या या मागण्या.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक (MIDC) परिसरात 6 नवीन सबस्टेशनची उभारणी करावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने महावितरणकडे केली. त्यापैकी भोसरी एमआयडीसीत 3, कुदळवाडी 1, तळवडे 1 व सेक्टर 7 येथे 1 सबस्टेशन उभारावे असे म्हटले आहे.

औद्योगिक परिसरात वीज वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी भोसरीच्या विभागीय कार्यालयात उद्योजक आणि महावितरणच्या अधिका-यांची बैठक झाली. कार्यकारी अभियंता देवकर, उपकार्यकारी अभियंता चव्हाण, आकुर्डीचे कवडे, निगडीचे चौधरी तसेच पिंपरी- चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुहास गवस, एमआयडीसी परिसरातील सर्व उद्योजक उपस्थित होते.

फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे. फिडर पिलर मधील HRC, फ्युज वायर व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व खराब झालेले दरवाजे बदलणे. वेगवेगळ्या साईजचे केबल stock मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी 24 तास उपलब्ध करून देणे कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते.

केबल नादुरुस्त वाहन वेळेवर उपलब्ध करून देणे. फिडरची लांबी कमी करणे. ओव्हर लोड ट्रान्सफॉरमरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्यक तेवढीच ठेवणे. आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉरमर बसविणे.

महावितरणच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला DPR कार्यान्वित करणे व नवीन DPR साठी पाठपुरावा करणे. सध्या अस्तित्वात असलेली ओव्हर लोड असलेली स्विचिंग स्टेशन्सची संख्या वाढविणे. महापालिका, महावितरण व पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना यांची एक संयुक्त बैठक घेऊन रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या केबल्स तोडल्या जातात त्यावर संयुक्तपणे उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांनी केली.

Related posts

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

pcnews24

महानगरपालिके तर्फे अर्बन स्ट्रीट स्केप (USD)” व रस्ते सुरक्षेबाबत कार्यशाळेबाबत.

pcnews24

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’प्रदान

pcnews24

वर्धापनदिनी झेपची नवी ‘ झेप ‘… ‘रेनवाॅटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट व सोलर सिस्टम प्रोजेक्टचे उद्घाटन

pcnews24

पिंपरी चिंचवड:”१५ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव -सचिन साठे सोशल फाउंडेशनवतीने आयोजन

pcnews24

जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेतर्फे विविध उपक्रम

pcnews24

Leave a Comment