दौंड ते पुणे रेल्वे लोकल लवकरच होणार सुरू
दौंड ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विभागाचे पाच ईएमयू रेक पुणे विभागाला मिळाल्याने लवकरच लोकसेवा चालू करण्यात येणार आहे. याचा फायदा 50 हजार प्रवाशांना होणार आहे. पण कामासाठी अजून 6 महिन्यांचा कालवधी लागण्याची शक्यता आहे. दौंडकर हे पुणे लोकलची मागणी करत होते. सध्या या मार्गावर डेमू सुरू आहे. दरम्यान, पुणे ते दौंड मार्गावर दिवसभरात 5 लोकल फेऱ्या असण्याचा अंदाज आहे.