March 2, 2024
PC News24
गुन्हा

कंपास कटर व दगड डोक्यात घालून दर्शनाचा खून,कारण सांगितले अनपेक्षित…

कंपास कटर व दगड डोक्यात घालून दर्शनाचा खून,कारण सांगितले अनपेक्षित…

लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात दर्शनाच्या गळ्यावर कंपासमधील कटरने वार करून आणि डोक्यात दगड घालून केला खून केल्याची कबुलीआरोपी राहुल हंडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली.

कंपासमधील कटर व ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले त्यामुळे कटरचा वार तिच्या गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी धक्कादायक माहिती आरोपी राहुलने पोलिसांना दिली आहे. परंतु, माझ्या हातून हे अनवधानाने घडले असेही तो सांगत आहे,असे चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

एमपीएससीच्या परीक्षेसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला. याचाच राग आल्याने मी तिचा खून करण्याचे ठरविल्याचे राहुल याने चौकशी दरम्यान सांगितले.

Related posts

रहाटणीच्या स्पा सेंटरवर छापा,दोन पिडीतांची सुखरूप सुटका.

pcnews24

26/11 हल्ल्यातील आरोपी भारतात आणणार.

pcnews24

मासिकपाळीच्या कारणावरून छळ,पत्नीने केली पती सासऱ्यांविरुद्ध तक्रार.

pcnews24

गातेगाव:चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीनेच संपवले.

pcnews24

महादेव जुगार ऍपचा मालक सौरभ चंद्राकर व त्याच्या भागीदारावर ईडी ची कारवाई;बॉलिवूडचे १४ सेलिब्रिटी रडारवर.

pcnews24

दिघी:साखरपुड्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार

pcnews24

Leave a Comment