आळंदी:मैलामिश्रित सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली.
आळंदी येथील 26 जून रोजी इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदी काठालगतच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येत आहे.
नदीपात्रातील हा फेस हवेमध्ये उडून इतरत्र पडतो आहे. सतत होणाऱ्या या जलप्रदूषणा बाबत इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे. 6 जून रोजी जिल्हाधिकारी (पुणे) यांनी जलप्रदूषणा संदर्भात बैठक आयोजित केली होती.त्यामध्ये जलप्रदूषणाचा अहवाल दर महिन्याला मिळावा. असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिली.