September 23, 2023
PC News24
अपघात

वडगाव फाटा (मावळ) येथील कंपनीमध्ये केमिकल गळती, परिस्थीतीवर नियंत्रण

वडगाव फाटा (मावळ) येथील कंपनीमध्ये केमिकल गळती, परिस्थीतीवर नियंत्रण

ओम साई एंटरप्राईज ( वडगांव फाटा, मावळ) या कंपनीमध्ये केमिकल ची गळती झाली होती.ही घटना सोमवारी (दि.26) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
यावेळी तळेगाव दाभाडे अग्निशमन दल व आपदा मित्र व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवत दुर्घटना टळली.

ओम साई एंटरप्राईज वडगाव फाटा, उर्से रोड ही कंपनी प्लास्टिक पासून ऑइल तयार करते. कंपनीत लाईट गेल्यामुळे कूलर बंद झाला, प्रेशर व तापमान वाढले आणि कंटेनरचा ग्लास फुटून मटेरियल गळती झाली व पाईप लीक होऊन गॅस बाहेर येवून आग लागली असावी ,असा प्राथमिक अंदाज एमआयडीसी तळेगाव अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे यांनी सांगितला.
कंपनीच्या जवळील सीआरपीएफ पासून अनेक भागात संपूर्ण धूर पसरलेला होता तसेच केमिकलच्या वासामुळे वाहन चालवणे देखील अवघड होते. अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसी विभाग तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद आपदा मित्र वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनेक सदस्य त्या ठिकाणी पोहोचून ओम साई कंपनीच्या आत गेले. केमिकल गळती होत असतानाही त्यांनी अंधार असताना देखील आगीवर नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना टळली.

घटनास्थळी काम केलेल्यां मध्ये एमआयडीसी अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे शेखर खोमणे, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे,सदस्य सर्जेस पाटील , गणेश ढोरे ,शुभम काकडे, प्रशांत शेंडे,कुनाल दाभाडे विनय सावंत,सत्यम सावंत इतर उपस्थित होते.

Related posts

जुनी सांगवी येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाश्यांकडून मागणी.

pcnews24

भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत

pcnews24

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुसेसावळी, सातारा येथे दंगल,एकाचा मृत्यू.

pcnews24

पुणे नाशिक महामार्गावर धावत्या शिवशाही बसला आग..सर्व प्रवासी सुखरूप

pcnews24

आज सकाळी पुण्यात आग लागल्याचे वृत्त 

pcnews24

पिंपरीतील वेताळ नगर येथे घराला आग.

pcnews24

Leave a Comment