वाकड: बिल्डर वर फसवणुकीचा गुन्हा, साडे पन्नास लाखांची फसवणूक, नक्की प्रकार काय?
फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात एका ग्राहकाची ग्राहकाची साडे पन्नास लाखांची फसवणूक झाली आहे.याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 मार्च 2022 ते 26 जून 2023 या कालावधीत वाकड येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शेट अँड पोपट एंटरप्राइजेस कंपनीद्वारे वाकड येथील टीयारा सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 1201 या फ्लॅटचा फिर्यादी सोबत एक कोटी 18 लाख 8 हजार रुपयांचा व्यवहार ठरवला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून ऑनलाईन बँकेद्वारे 34 लाख 4 हजार 200 रुपये तर रोख स्वरूपात 16 लाख 50 हजार रुपये असा एकूण 50 लाख 54 हजार दोनशे रुपये घेतले. मात्र फ्लॅटचा खरेदी विक्री व्यवहार न करता घेतलेली रक्कम ही परत केली नाही. तसेच परस्पर हा फ्लॅट इतर दोघांना विकत फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याप्रकरणी अजिंक्य रवींद्र ओझा (वय 32 राहणार वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रुपेश छोटा लाल शेठ (वय 55 राहणार कोरेगाव पार्क) व उतीन चव्हाण (वय 40 राहणार कोरेगाव पार्क) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.