February 26, 2024
PC News24
राजकारण

पिंपरी चिंचवड वर पुन्हा भाजपचीच सत्ता :“मोदी@9” जनसंपर्क अभियान : अश्विनी जगताप

पिंपरी चिंचवड वर पुन्हा भाजपचीच सत्ता :“मोदी@9” जनसंपर्क अभियान : अश्विनी जगताप

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षात सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास प्रकल्प राबविण्यात आले. या विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ देशभरातील सर्व थरातील महिला, कष्टकरी कामगार व सर्वसामान्य जनतेला कश्या पद्धतीने झाला आहे ही माहिती

सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात “मोदी@9” हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी बोलताना आमदार अश्विनी जगताप बोलत होत्या.

चिंचवड विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात आले. या द्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधला असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचे अश्विनी जगताप यांनी सांगितले.

या अभियान कार्यक्रमात माजी महापौर उषा ढोरे , भाजपचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकर जगताप, मोदी@9 चे चिंचवड विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे , माजी पक्षनेते नामदेव ढाके , “मोदी@9” प्रदेश सदस्य संतोष कलाटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत चोंधे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा उज्वला गावडे, “मोदी@9” अंतर्गत अभियानांचे संयोजक शत्रुघ्न काटे , संदीप कस्पटे, राजेंद्र चिंचवडे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, बाळासाहेब ओव्हाळ, सागर आंघोळकर, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप गाडे,भाजपा सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

Related posts

I.N.D.I.A नेत्यांनी केले राहुल गांधीं यांचे लोकसभेत जोरदार स्वागत!१३६ दिवसां नंतर कमबॅक.

pcnews24

‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’भाजपा युवा मोर्चातर्फे ‘लाभार्थी संवाद’ चे आयोजन

pcnews24

पंतप्रधान मोदींकडून नारीशक्ती वंदन विधेयकाची घोषणा;ईश्वराने अशी अनेक पवित्रं काम करण्यासाठी माझी निवड केली आहे

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये फूटिचे राजकारण कि राजकारणामूळे फूट !!!!

pcnews24

जपान दौऱ्यावर पंतप्रधान रवाना.

pcnews24

निलेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य, औरंगाजेबचा पूनर्जन्म….

pcnews24

Leave a Comment