September 26, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड सांस्कृतिक चळवळीला योग्य न्याय मिळावा- अमित गोरखे यांची मागणी,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन.

पिंपरी चिंचवड सांस्कृतिक चळवळीला योग्य न्याय मिळावा- अमित गोरखे यांची मागणी,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन.

येत्या 1 जुलै 2023 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंमलबजावणी सुरू नाट्यगृहांच्या भाड्यात प्रस्तावित वाढ केली असून तारखांचे वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने तारखांचे हे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढीचा फेरविचार करून यास तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाटके, बालनाट्य, गाण्यांचे कार्यक्रम, एकांकिका आदींसाठी अपेक्षित तारखा मिळणार नाहीत. यात आयोजकांचे नुकसान व रसिक प्रेक्षकही नाराज होणार त्यामुळे ऑनलाईन तारखांचे वाटप करू नये.

नाट्यगृहाची तारीख न मिळाल्यास तथा मिळालेली तारीख हातातून गेल्यास अनेकांची गैरसोय होते व तो दिवस वाया गेल्याने आर्थिक नुकसानही होते.तसेच यावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना ही याचा फटका बसू शकतो. या निवेदनात त्यांनी अनेक लक्षवेधी मागण्या केल्या आहेत.त्यात नाट्यगृहांची भाडेवाढ अवाजवी असू नये. कार्यक्रमांच्या आयोजकांना परवडणारे असे दर असावेत.

तसेच नाट्प्रयोग होण्यापूर्वी तीन महिने अगोदर भाडेदर, अनामत रक्कम भरणे शक्य होणार नाही त्यामुळे या निर्णयाचा आपण फेरविचार करावा यांचा समावेश आहे.तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच नाटकांना समाधानकारक प्रेक्षक वर्ग मिळतो त्यामुळे नाट्यगृहांच्या तारखा आरक्षित करताना या तारखा प्राधान्याने नाटकांसाठी राखून ठेवाव्यात.नाट्यगृहांमध्ये नियुक्त केले जाणारे अधिकारी जाणकार असावेत आणि किमान या क्षेत्राविषयी त्यांना पुरेशी माहिती असावी.

पिंपरी-चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत असतानाच या सांस्कृतिक चळवळीला योग्य तो न्याय मिळावा म्हणून भाडे वाढ, ऑनलाईन बुकिंग यासारख्या निर्णयास स्थानिक व इतर विभागातील कलाकारांकडून कडकडून विरोध होत आहे .त्यामुळे तात्काळ नगर विकास विभागाला सूचना देऊन भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अमित गोरखे यांनी केली आहे.

Related posts

IPL सट्टाबहाद्दरांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

pcnews24

भोसरी येथील कंपनीत शॉपचा पत्रा उचकटून जॉब चोरी.

pcnews24

ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमामुळे भक्ती-शक्ती चौकातील वाहतुकीत शनिवारी बदल.

pcnews24

कलाकृती साकारताना अध्यात्मिकतेबरोबरच चिंतनशील मनाची एकाग्रता गरजेची :श्री. वासुदेव कामत.

pcnews24

चिंचवड:वायुगळतीच्या वृत्ताने अग्निशमन विभागाची उडाली एकच धांदल

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पैसे मिळणार थेट बँक खात्यावर

pcnews24

Leave a Comment