चिंचवड: श्री साईनाथ बालक मंदिर मध्ये रंगला बालचमूंचा पालखी सोहळा.
“ज्ञानोबा माऊली तुकाराम” ‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल,’.अशा नामघोषात श्री साईनाथ बालक मंदिर च्या मुलांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दर्शनासाठी निघाला. बालक मंदिरांमधील सर्व मुले मुली हातात भगवे झेंडे घेऊन, टाळ घेऊन, डोक्यावर तुळशी वृंदावन, तर हातामध्ये घागरी घेऊन पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई ,नामदेव, चांगदेव अशा सर्व संतांच्या वेशभूषा करून मुले आली होती.
बालवर्गामधील कैवल्य सोनटक्के आणि श्रद्धा भोसले विठ्ठल रखुमाई झाले होते. केवळ पाच वर्षांच्या वरद मावीनकट्टी या विद्यार्थ्याने संत नामदेवांचे कीर्तन करून उपस्थितांची मने जिंकली. सारे वातावरण भक्तीमय झाले होते. बालवर्गामधील स्वानंदी शिंदे ,आरव सरोदे, मोहिषा देव, पृथ्वी पुजारी, सर्वज्ञा देशमुख, आनंदी थिटे या विद्यार्थ्यांनी वारी मधील भाषणे केली. खियांश गोकर्ण ,पृथ्वी राजपूत, दत्त वरद गुर्जर, शुभम वायकर ,अवनी जाधव, पृथा शर्मा ,शिवांश फेंगसे, रुद्र कुंभार साजरी कुलकर्णी ,अद्विका हेंद्रे हे सर्व बाल वर्गातील विद्यार्थी संत झाले होते. नाम गजर झाल्यावर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका माननीय निशाताई बेलसरे, मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर, कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक, स्वाती कुलकर्णी ,प्रज्ञा पाठक ,मानसी कुंभार ,शितल कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहभाग दिला तर प्रज्ञा जोशी आणि योगिता देशपांडे यांनी उपक्रमामध्ये सहकार्य केले.