महाराष्ट्र:वंदे भारत ट्रेनचे तिकीट विमानापेक्षा महाग !
मोठ्या दिमाखात सुरु झालेल्या वंदे भारत गाड्या आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. नुकतीच सुरु झालेल्या मुंबई – गोवा वंदे भारत गाडीचे तिकिटदर बघितल्यावर प्रवाशी म्हणाले की, याच्यापेक्षा विमानप्रवास परवडले. या गाडीत वातानुकूलित डब्यातील आसनाचे दर 1970 रुपये तर एक्झिक्युटीव्ह दर 3535 रुपये आहे. त्या तुलनेत विमानाचे तिकीट हे 1800 ते 2500 पर्यंत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.