मुंबई:रहिवासी संकुलात विनापरवानगी ईदची कुर्बानी चुकीची.
आपला भारत देश हा संपूर्ण जगात विविधतेने नटलेला असा देश आहे.आपल्या देशात अनेक धर्म एकत्र राहून आपल्या देशाचा एकोपा हा अतिशय सुदृढपणे जगासमोर मांडतात, परंतु या संस्कृतीला किंवा या परंपरेला बराचदा दोन बाजू देखील निर्माण होतात आणि त्यावेळेस प्रशासनाला पुढाकार घेऊन समाजामध्ये समन्वय साधावा लागतो असेच काही घटना मुंबईमध्ये घडली आहे.
मीरारोडमध्ये जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत बकऱ्यावरून वादंग निर्माण झाला. यावरुन रहिवासी संकुलात खुल्या जागेत कुर्बानी देण्यास विरोधात सोसायटीतील हरेश जैन आणि अपेक्षा शाह यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर रहिवासी संकुलात विनापरवानगी कुर्बानी देणे चुकीचे असल्याचे निरिक्षण हायकोर्टाने दिले. तसेच नागपाडा पोलिसांना याप्रकरणी कारवाई करत योग्य तो बंदोबस्त देण्याचे आदेश दिले.