महाराष्ट्र :हवामान खात्याचा २९ जूनला ऑरेंज अलर्ट,राज्यात अतिवृष्टीचा इशारा
यंदा मान्सूनला राज्यात उशिराने सुरुवात झाली असली तरी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस जोरदार बरसला आहे.पुढील २४ तास म्हणजे ‘आषाढी’ च्या दिवशी महत्वाचे असून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबई,पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असला तरी अनेक ठिकाणांहून पडझडीच्या बातम्या येत आहेत.शुक्रवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.त्यामुळे या भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.