March 1, 2024
PC News24
वाहतूक

पुणे:चांदणी चौकातील वाहतूक काही काळासाठी बंद, मुख्य पुलाची गर्डर उभारणी

पुणे:चांदणी चौकातील वाहतूक काही काळासाठी बंद, मुख्य पुलाची गर्डर उभारणी

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर चांदणी चौक येथे पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी रस्ता काही काळासाठी बंद ठेवला जाणार आहे. ४ ते १५ जुलै दरम्यान मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनपर्यंत मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. तर, मल्टी ॲक्सेल वाहनांलाठी तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

चांदणी चौकात चार जुलै ते १५ जुलै या कालावधी मध्ये मध्यरात्री साडेबारा पासून ते पहाटे साडेतीन पर्यंत वाहतूक बदलास सुरुवात होणार आहे. यावेळी हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील. मुंबईकडून सातारा/ कोथरुडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प सहाचा वापर करतील. तसेच, सातारा व कोथरूड मार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प आठचा वापर करण्यात येईल. इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही. त्यामुळे कुठलीही वाहतूक थांबणार नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक कदम यांनी दिली.

चांदणी चौक प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सब स्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चर काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त मल्टी ॲक्सेल वाहनांची वाहतूक, फक्त तीन तासांसाठी थांबविण्यात येणार आहे. ही वाहने योग्य त्या ठिकाणी थांबवली जातील किंवा त्या कालावधीत त्यांना इतर मार्गाचा अवलंब करवा लागणार आहे.

Related posts

मोरवाडी चौकातील सिग्नलची निर्धारित वेळ वाढविण्याची मागणी.

pcnews24

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग.

pcnews24

एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाचे महत्वपूर्ण पाऊल….अधिकृत थांब्यावर नाश्ता ३० रूपयांना मिळणार

pcnews24

पुणेकरांसाठी घर ते मेट्रो स्टेशन शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होणार; RTO कडून पुढाकार.

pcnews24

निष्काळजीपणे वाहन चालविणे आता,अजामीनपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

मुंबई शहरातील प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग.

pcnews24

Leave a Comment