पिंपरी-चिंचवड शहरासाठी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याबाबत निर्णय..मंत्रिमंडळाची मान्यता
पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक अपर पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त अशी पदे निर्माण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या या(बुधवार,दि.28) बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरासाठी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शहरीकरण वेगाने होत आहे. ओद्योगीकीकरणाचा विस्तार यामुळे शहरात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. गुन्हेगारीतही वाढ होत आहे यामुळे पोलिसांच्या कामाची व्याप्ती वाढली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आयुक्तालयाला गरज होती.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही पदे निर्माण करण्याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार ही पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही पदे भरण्याची प्रक्रिया देखील लवकरच केली जाणार आहे.