September 26, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

मोशी येथे उभारणार धर्मवीर संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा..संभाजी भिडे गुरूजी यांच्याकडून ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ जागेची पाहणी.

मोशी येथे उभारणार धर्मवीर संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा..संभाजी भिडे गुरूजी यांच्याकडून ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ जागेची पाहणी

मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत जगातील सर्वांत उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ उभारण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि शिव-शंभू प्रेमी यांच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’चे काम हाती घेण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा तब्बल 140 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम दिल्ली येथील कार्यशाळेत सुरू आहे.

यापूर्वी, ज्या जागेत हा पुतळा उभारण्यात येत होता. ती जागा दोन इमारतींच्या मध्ये असल्यामुळे अपुरी होती. त्यामुळे प्रशस्त जागेत पुतळा आणि शंभू सृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरली होती त्याला यश मिळाले असून आता ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील अडीच एकर जागा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असून महापालिका प्रशासनाकडे जागेचे हस्तांतरणही करण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने संभाजी भिडे गुरुजी आले असता त्यांनी प्रस्तावित शंभूसृष्टीच्या जागेची पाहणी करण्याची इच्छा केली होती. यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, माजी स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, संतोष लांडगे, अमित जावळे, गणेश भुजबळ, सतिश लांडगे, मोशीतील ग्रामस्थ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा मोशी येथे साकारत आहे, ही आम्हा पिंपरी-चिंचवडकर आणि शिव-शंभूप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. शंभूराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची उज्ज्वल यशोगाथा भावी पिढ्यांना समजावी आणि शिव-शंभू हा विचार घराघरांत रुजावा, या करिता हा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदूभूषण’ उभारला जात आहे.

नवीन जागेत उभारण्यात येणाऱ्या या प्रेरणास्थळाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक गुरूवर्य भिडे गुरूजी यांनी भेट दिली. ‘‘आपल्या राजाच्या कार्याची भव्यता जशी होती, तसेच भव्य शंभूसृष्टी या ठिकाणी उभारली जात आहे…’’ अशी कौतुकाची थाप गुरूजींनी दिली. त्यामुळे हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. असे भावना पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार,श्री.महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

Related posts

औद्योगिक सांडपाण्याबाबतची माहिती जमा करण्याचे आयुक्तांचे आवाहन

pcnews24

एमआयडीसीने जीएसटी व त्यावरील व्याजाच्या नोटिसा त्वरित रद्द करण्यात याव्या : PCMC उद्योगसंघटनेची उदय सामंत यांच्याकडे मागणी

pcnews24

अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.

pcnews24

पिंपळे निलख मधील कुटुंबाचा अनोखा पिंपरी ते लंडन कार प्रवास.

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांना प्रशासकांकडून मंजुरी.

pcnews24

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

pcnews24

Leave a Comment