महाराष्ट्र:पुणे होणार ‘EV’ हब! राज्यातील इतर जिल्ह्यातही होणार मोठी गुंतवणूक
राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बुधवारी मुंबईमध्ये झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे उभारल्या जाणाऱ्या ‘ईव्ही’ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गोगोरा इंडिया, एथर एनर्जी आणि पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स अशा तीन कंपन्या पहिल्या टप्प्यामध्ये १३ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक करणार असून, त्याद्वारे हजारो रोजगार उपलब्ध होतील, असे उद्योग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यातील ‘ईव्ही’ प्रकल्प
– ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या ईव्ही क्षेत्रातील १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता.
-टाटा समूहाच्या ‘ईव्ही’ निर्मितीच्या प्रकल्पालाही मान्यता.
– आता गोगोरा आणि पिनॅकल मोबिलिटी हे दोन मोठे प्रकल्प ,या प्रकल्पा द्वारे भविष्यात १२ हजार ‘बॅटरी स्वॅपिंग स्टेशन’ तयार करणार. त्यातून महाराष्ट्रात ‘बॅटरी स्वॅपिंग’चे जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
‘गोगोरा’कडून ईव्ही आणि बॅटरी निर्मितीही करण्यात येणार आहे.तसेच पिनॅकल मोबिलिटी’तर्फे उभारला जाणारा प्रकल्प व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहे.
– पुण्यात इलेक्ट्रॉनिक पार्क होणार असल्याने ‘ईव्ही’साठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उत्पादनही होणार आहे.
– या प्रकल्पात इलेक्ट्रिक बस, ट्रक, कंटेनर अशा वाहनांच्या निर्मितीसह अद्ययावत इलेक्ट्रिक वाहननिर्मिती सुविधा या प्रकल्पाद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे.
राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक
– उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
– या गुंतवणुकीत नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा. हा प्रकल्प २१ एकर जागेवर उभारणार असून, एक हजार ३५४ औद्योगिक आणि व्यापारी आस्थापना याठिकाणी सुरू होतील. येथे रत्ने आणि आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करणार
– रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीच्या २ हजार ७०० कोटी रुपयांच्या, ‘स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज’च्या २ हजार ३३ कोटींच्या, तर जनरल पॉलिफिल्मस कंपनीचा ५०० कोटी गुंतवणुकीला मान्यता.
– नंदुरबार, नगर आणि सातारा येथेही गुंतवणुकीचे निर्णय या वेळी घेण्यात आले.
– छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रील व्हेइकल्स आणि बॅटरीचीनिर्मिती करणाऱ्या इथर एनर्जी कंपनीद्वारे ८६५ कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.