पुणे जिल्ह्यात मोशी येथे होणार तिसरे आंतरराष्ट्रीय स्टेडियम
पिंपरी – संपूर्ण महाराष्ट्रात औद्योगिकनगरी, कामगारनगरी, स्मार्ट सिटी, आणि आता मेट्रोसिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-
चिंचवड महापालिकेच्या वतीने आता क्रीडा सुविधा दर्जेदार करून देण्यास सुरूवात केली आहे.मोशी येथे महापालिकेच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे चारशे कोटींचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे नियोजन येत्या काळात केले आहे. स्टेडियमच्या उभारणीसाठी व सल्लागार नेमण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली असून अंदाजे चारशे कोटी गृहीत धरण्यात आले आहे.
मोशीतील प्रभाग क्र.०३ येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या या कामासाठी सन २०२३ २४ च्या अंदाजपत्रकात चारशे कोटी रूपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र सल्लागार डिझाइन, एस्टीमेट करणार त्यानंतर रक्कम अंतिम होईल, तसेच स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी अद्याप निश्चित झालेले नाही.असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
शहर परिसरात अनेक नामांकित कंपन्या असा शहराचा नावलौकिक असतानाच आता क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळविण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
मोशीत महापालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय किक्रेट स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले होते. यामध्ये ओम टेक्नॉलिक्स यांनी सर्वात लघुतम असा १.९९ (निविदा पूर्व पुण्यात क्रिकेट सामने होणे बंद १९८ टक्के तर निविदा पश्चात ०.०१ टक्के) दर सादर केला आहे. आणि पालिकेच्या निधीतून करायचे हे त्यामुळे त्यांना सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास मान्यता दिली आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ओम टेक्नॉलिक्स यांना शासनाच्या निर्णयानुसार निविदा पूर्व ०.५० टक्के तर निविदा पश्चात १.४९ टक्के असे१.९९ टक्के इतकी फी टप्या-टप्याने अदा करण्यात येणार आहेत.
यापूर्वी पुण्यात पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम तर गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशएन स्टेडियम आहे. पुण्यातील स्टेडियममध्ये काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत होते. मात्र, गहुंजे येथे स्टेडियम झाल्यापासून पुण्यात क्रिकेट सामने होणे बंद झाले आहे.मोशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे नियोजन गहुंजे स्टेडियमच्या धर्तीवरच केले आहे. असे झाल्यास पुणे जिल्ह्यात एकूण तीन स्टेडियम होतील.