पुणे व पिंपरी-चिंचवड बस मार्गांचा पीएमपीएमएल कडून विस्तार, तर एका मार्गात बदल
पीएमपीएमएलकडून पुणे प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. 35 अ व 167 या दोन बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. बसमार्ग क्र. 35 अ शिवाजीनगर/सिमला ऑफिस ते डांगे चौक या मार्गाचा विस्तार इंदिरा कॉलेज (ताथवडे) पर्यंत करण्यात येत आहे व बसमार्ग क्र. 167 वाघोली ते हडपसर या मार्गाचा विस्तार भेकराईनगर डेपो पर्यंत करण्यात येत आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. 277 – भोसरी ते कोथरूड डेपो या मार्गात बदल करून पिंपळेगुरव, साईचौक व सांगवी मार्गे करण्यात येत आहे.मार्ग क्रमांक – रूट – बससंख्या – फ्रिक्वेन्सी 35 अ शिवाजीनगर/सिमला ऑफिस ते इंदिरा कॉलेज (ताथवडे) – औंधगाव, डांगे चौक, ताथवडे गाव,जे.एस.पी.एम कॉलेज,डी.वाय.पाटील कॉलेज – 3 – 50 मिनिटे.
167 भेकराईनगर डेपो ते वाघोली – मगरपट्टा, मुंढवा व खराडी बायपास – 16 – 10 मिनिटे.277 भोसरी ते कोथरूड डेपो – पिंपळे गुरव, साई चौक व सांगवी – 4 – 60 मिनिटे.या नवीन बदल झालेल्या बस सेवेचा लाभ प्रवाशी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.