पुणे:सदाशिव पेठेत झालेल्या गंभीर हल्ल्या प्रसंगी गैरहजर असलेल्या तीन पोलिसांचे निलंबन
दोन दिवसापूर्वी शंतनू जाधव या आरोपीने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण,घटनास्थळा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट चौकीत पोलिस हजर नव्हते.
पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे ह्या तिघांना निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.
घटना स्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असताना घटनेनंतर तब्बल 20 मिनिटांनी पोलीस कर्मचारी पोलिस चौकीत आणि घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती सोशल मीडियावर समोर येताच, पुणेकर नागरिकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर याच पोलिस चौकीचा आधार जखमी तरुणीला घ्यावा लागला होता.