‘विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी अस्वस्थ’ :शरद पवार.
‘देशभरातल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत, त्यामुळे ते पदाला न शोभणारे वक्तव्य करत आहेत, पंतप्रधान पद, संसदीय सदस्य ही एक संस्था आहे, त्यामुळे त्या पदाचा मान ठेवला पाहिजे याची काळजी मोदींनी घ्यायला हवी,’ असे मत शरद पवारांनी मांडले आहे. दरम्यान देशातल्या विरोधकांची पुढील बैठक 13 आणि 14 जुलै रोजी बंगळुरू येथे होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.