तळेगाव एमआयडीसी परिसरातून (मावळ) जिवंत काडतुस व पिस्टलसह तरुणाला अटक
गुन्हे शाखा पाचच्या पथकाने ही मावळातून एकाला देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस यासह अटक केली आहे. हि कारवाई सुदवाडी फाटा जांबवडे येथे 24 जून रोजी दुपारी करण्यात आली .
मयुर अशोक पवार (वय 29 रा.वराळे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बुधवारी (दि.28) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी अटक केली असता त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल व 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
दोन दिवसांपुर्वीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार पिस्टल 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक करत एक मोठा कट उधळून लावला. सारख्या घडणाऱ्या या घटनांमुळे बेकायदेशीररित्या वाढत जाणारी शस्त्रांची संख्या ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.