September 28, 2023
PC News24
गुन्हा

प्रतिस्पर्धी कंपनीला गोपनीय माहिती देवून कंपनीची फसवणूक

प्रतिस्पर्धी कंपनीला गोपनीय माहिती देवून कंपनीची फसवणूक

कंपनीची गोपनीय माहिती चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला देत मूळ कंपनीचे चार कोटीचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे यामुळे कंपनीचे तब्बल चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पिरदान नैन ( वय 50 राहणार मोशी ) असे गुन्हा दाखल करण्यात आकेल्या व्यकीचे नाव आहे. हा सारा प्रकार एक डिसेंबर 2017 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत वासुली येथील पॅक टाईम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये घडला.सागर रोहिदास कानवडे (वय 30 ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.28) फिर्याद दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याच्याकडे सोपवलेल्या कामाची गोपनीय माहिती त्याने स्वतःच्या मेलवर घेतली व ती त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीचे प्रतिस्पर्धी असणारे भवानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड फाईन फार्मा पॅक एलएलपी यांना दिली. यामुळे फिर्यादीस 4 कोटींचे नुकसान झाले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

घोडेगाव: चार नराधमांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार… घोडेगाव,आंबेगाव ता. जि.पुणे येथील घटना

pcnews24

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

pcnews24

चिंचवड:सरकारी कामाच्या टेंडर बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

pcnews24

दहा लाखांसाठी वडिलांनीच केले स्वतःच्या आणि मेव्हणीच्या मुलींचे अपहरण.

pcnews24

पत्रकार रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीच्या मागणीचे निवेदन,कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा :पत्रकार संघ

pcnews24

पिंपरी: पश्चिम बंगालच्या तरुणीचा विनयभंग,पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापती विरुद्ध गुन्हा दाखल.

pcnews24

Leave a Comment